आरटीई प्रवेशास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:08 AM2021-07-11T04:08:49+5:302021-07-11T04:08:49+5:30

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत ...

RTE admission extended till July 23 | आरटीई प्रवेशास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशास २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

Next

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात ४६ हजार ३७१ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित झाले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील ७ हजार ८५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असून, राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने २ लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले. त्यात प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सध्या शाळा स्तरावर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने १० जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत दिली होती. परंतु, केवळ ५० टक्के प्रवेश झाल्याने शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये आरटीई प्रवेश होत नाहीत. सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी, राज्यात केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना आरटीईतून प्रवेश मिळाला आहे. परिणामी या शाळांची समजूत काढल्याशिवाय उर्वरित प्रवेश होणार नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळांची समजूत काढली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

-----------

आरटीई अंतर्गत विविध जिल्ह्यांत झालेले प्रवेश

अहमदनगर १९१९, अकोला १,३५४, अमरावती १०२१, औरंगाबाद १९४२, भांडारा ५६५, बीड १,०३०, बुलडाणा १,२७४, चंद्रपूर १०२५, धुळे ७७३, गडचिरोली ३७०, गोंदिया ५९६, हिंगोली २९५, जळगाव २१५७, जालना ७३८, कोल्हापूर १०६३, लातूर ८२३, मुंबई १६९२, नागपूर १८८९, नांदेड ६९६, नंदुरबार २१७, नाशिक २,७७५, उस्मानाबाद ३११, पालघर १,०९२, परभणी ४२६, पुणे ७,६२३, रायगड २,५२१, रत्नागिरी ५२१, सांगली ७४८, सातारा ४७०, सिंधुदुर्ग १६७, सोलापूर ९१४, ठाणे ४,८८८, वर्धा ८२२, वाशीम ३३०, यवतमाळ ८२१.

Web Title: RTE admission extended till July 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.