आरटीई प्रवेशास शनिवारपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:39+5:302020-11-26T04:26:39+5:30
पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस ...
पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिक्षण विभागाने प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशास मुदत दिली होती. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांनी ८१ हजार ७०५ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक १६, हजार ९५० जागा असून आत्तापर्यंत या जागांवर नियमित फेरीतून ११ हजार १४३ विद्यार्थ्यांचा तर प्रतिक्षा यादीतील २ हजार ८४५ विद्यार्थ्यांचा अशा एकूण १३ हजार ९८८ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
कोरोनामुळे नियमिय आरटीई प्रवेश प्रक्रियेस वेळेवेळी मुदतवाढ दिली. शिक्षण विभागाने पुन्हा एकदा २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.