प्रतीक्षा यादीतील ‘आरटीई’ प्रवेश बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:01+5:302021-09-22T04:12:01+5:30
शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेशासाठी पुरेसी मुदत ...
शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेशासाठी पुरेसी मुदत देण्यात आली. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार होते. मात्र, सुमारे महिना- दीड महिन्यापासून ही प्रवेश प्रक्रिया रखडली होती. पुणे जिल्हा वगळता राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील ४ हजार 986 विद्यार्थ्यांना या फेरीतून प्रवेश मिळाला आहे.
---------
राज्यात नियमितपणे झालेले आरटीई प्रवेश
प्रवेश देणाऱ्या एकूण शाळा : ९,४५३
आरटीईच्या एकूण जागा : ९६,६८४
प्राप्त झालेले ऑनलाइन अर्ज : २,२२,५८४
प्रवेशासाठी निवडलेले विद्यार्थी : ८२,१३२
एकूण झालेले प्रवेश : ६१,७४८
------------------
पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक जागा असून ९८५ शाळांमधील १४ हजार ७७३ जागांसाठी ५५ हजार ८१३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १४ हजार ५६७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. ऑनलाइन प्रक्रियेतून १० हजार ८५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, उर्वरित जागांवरील प्रवेश अद्याप झाले नाहीत.
--------------------------------
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील प्रवेश येत्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे