RTE | आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन 

By प्रशांत बिडवे | Published: April 3, 2023 07:35 PM2023-04-03T19:35:24+5:302023-04-03T19:35:24+5:30

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची माहिती...

RTE Online Lottery to be held on 5th April pune latest education news | RTE | आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन 

RTE | आरटीई ऑनलाईन लॉटरीचे ५ एप्रिल रोजी आयोजन 

googlenewsNext

पुणे : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के रिक्त जागांवर मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी सोडतीचे येत्या ५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी दि. १  ते २५ मार्च अंतर्गत ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यभरातील ८ हजार ८२८ शाळामध्ये  १ लाख १९६९ जागा रिक्त आहेत. त्यासाठी सुमारे तीन लाख  ६४ हजार ४७०  अर्ज प्राप्त झाले आहेत.

ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवारी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे काढण्यात येणार आहे असेही शरद गोसावी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. 

Web Title: RTE Online Lottery to be held on 5th April pune latest education news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.