माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या : मित्रानेच केला खुन, दोघांना तेलंगणातून घेतल ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 09:51 PM2019-02-12T21:51:31+5:302019-02-12T21:52:02+5:30

शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) यांचे अपहरण करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट -लवारा रोडवरील उरवडे घाटात खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़.

RTI activist murdered: A friend has murdered and arrest by Pune Police | माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या : मित्रानेच केला खुन, दोघांना तेलंगणातून घेतल ताब्यात

माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या : मित्रानेच केला खुन, दोघांना तेलंगणातून घेतल ताब्यात

googlenewsNext

पुणे : शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) यांचे अपहरण करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट -लवारा रोडवरील उरवडे घाटात खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे़. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना तेलंगणा येथे मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे़. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून ही हत्या वैयक्तिक कारणावरुन झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे़. मुख्य आरोपीला पकडल्यानंतरच खरे कारण उघडकीस येऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले़. 
मुख्यार अली (वय ३४) आणि फारुख खान (वय ३३, दोघे रा़ उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत़. तर मुख्य आरोपी प्रकाश वर्मा हा फरार आ.हे़ 
                        याबाबतची माहिती अशी, विनायक शिरसाट यांनीजांभुळवाडी, शिवणे व परिसरातील अनेक बेकायदा बांधकामाविषयी पीएमआरडीए कडे अर्ज करुन त्याची माहिती मागविली होती़.त्यातील अनेक बांधकामावर कारवाई होऊन ती पाडली गेली होती़.याबाबत त्यांचे वडिल सुधाकार ऊर्फ अण्णा शिरसाट यांनी सांगितले की, ३० जानेवारी रोजी विनायक सकाळी आमच्या जांभुळवाडी येथील कामावर वायरची बंडले घेऊन गेला होता़. दुपारी अडीच वाजता त्याच्याशी फोनवर बोलणे झाले़. त्यानंतर त्याने मित्रांना फोन केले होत़े़.
                 तो जांभुळवाडी येथून ३० जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता सीसीटीव्हीत जाताना दिसतो़.त्यानंतर त्याच रात्री अकरा वाजता भूमकर चौकात त्याची गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली़. ३० जानेवारीला आम्ही भारती विद्यापीठ पोलिसांकडे गेलो़. त्यांनी अपहरणाची तक्रार घेण्याऐवजी केवळ मिसिंगची तक्रार घेतली़. ५ फेब्रुवारीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला़.त्याला कोण कोण बिल्डर धमक्या देत होते़, याची माहिती पोलिसांना दिली होती़ .कारवाई करावी, म्हणून आम्ही पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्त यांना दोनदा भेटलो तरीही कोणीही कारवाई केली नाही, अण्णा शिरसाट यांनी सांगितले़. शहर गुन्हे शाखांची विविध पथके व भारती विद्यापीठ पोलीस शिरसाट यांचा शोध घेत होती़.त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन मुठा गावाजवळ आढळले. त्यामुळे त्या परिसरातही शोध घेण्यात आला होता़ घाटातून जाताना काही जणांना कुजल्याचा वास आल्याने त्यांनी पौड पोलिसांना याची माहिती दिली़ तेव्हा भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलीस यांनी दरीत शोध घेतला असताना सोमवारी दुपारी कुजलेला एक मृतदेह आढळून आला़. विनायकचा भाऊ किशोर याने त्यावरील कपड्यांवरुन तो मृतदेह विनायकचा असल्याचे ओळखले़. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तो ससून रुग्णालयात पाठविण्यात आला़. दरम्यान, विनायक शिरसाट यांच्या नातेवाईकांनी माहिती अधिकाराच्या वापरामुळे त्याचे अपहरण करण्यात आले असून अनेक बांधकाम व्यावसायिक व चार गावातील लोकांची नावे संशयित म्हणून दिली असल्याने पोलिसांचा तपास त्याभोवतीच फिरत राहिला़ पण, त्यातून काहीही हाती लागले नव्हते़ सीसीटीव्हीतून दिसलेल्यांचा शोध घेत असताना ते तेलंगणा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक तेलंगणा येथील मेहबुबाबाद येथे गेले़ त्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे़ .


हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
 माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या मारेकºयांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़ मात्र, ही हत्या माहिती अधिकारातून झाली नसून त्यामागे वैयक्तिक कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़  मुख्य आरोपी सापडल्यानंतर त्याविषयी खुनामागचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल़
विनायक शिरसाट हे जांभुळवाडी येथून सायंकाळी निघाल्यावर त्याने मित्रांना फोन केले होत़ त्यानंतर तो प्रकाश वर्मा या मित्राबरोबर होता़ वर्मा याने वाहनचालक मुख्यार अली व फारुख खान यांना बोलावून घेतले़ प्रकाश वर्मा याच्याशी विनायक याची ६ ते ७ महिन्यांपूर्वीपासून ओळख होती़ वर्मा याने सांगितल्याप्रमाणे मुख्यार व फारुख हे मोटार घेऊन आले़ नºहे येथे त्यांनी विनायकला त्याची गाडी ठेवायला सांगून यांनी आणलेल्या गाडीतून त्याला घेऊन गेले़ दरम्यान, विनायक याने त्याचा मुनीम याला १० ते १५ लाख रुपये तयार ठेवायला सांगितले होते़ या तिघांनी विनायक याला लवासा रोडला रात्री नेले़ तेथे उरवडे घाटात प्रकाश वर्मा याने त्याच्यावर चाकूने वार केला़ त्यानंतर त्याचा मृतदेह दरीत टाकून हे सर्व जण पुन्हा पुण्यात आले़. वर्मा याने विनायकची हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे त्याला पकडल्यावरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़. 
              जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतली होती़ ससून रुग्णालयातील शवागाराबाहेर मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते़. त्यांनी घोषणाबाजी करुन या प्रकरणाचा निषेध केला़. पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी तेथे भेट देऊन संबंधितांना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगितले़. त्यानंतर सायंकाळी त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला़. याबाबत पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाली असेल तर संबंधितांकडे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल़ त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे़. 

Web Title: RTI activist murdered: A friend has murdered and arrest by Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.