माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:55 PM2021-07-07T17:55:53+5:302021-07-07T19:56:05+5:30

गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी अखंड प्रयत्न सुरु होते.

RTI activist Ravindra Barhate remanded in police custody till 16 July | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Next

पुणे

जमीन लाटणे, जमिनींच्या कागदपत्रात फेरफार, खंडणी, फसवणूक असे तब्बल 12 गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवीद्र ब-हाटे याला बुधवारी 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी दिला. एक वर्षाहून अधिक काळ तो फरार होता. त्या कालावधीत आॅनलाईन खुरापती सुरूच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने कायद्याला सामोरे जाण्याचे टाळून फरार कालावधीत माध्यमांद्वारे स्वत:चे उदात्तीकरण करण्याबरोबरच तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, साथीदार फियार्दी यांच्यावर टीका टिप्पणी करून दबाबाखाली ठेवून खच्चीकरण करण करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. तो ग्राह्य धरून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, यापूर्वी अटक झालेली रवींद्र ब-हाटेची पत्नी संगिता (वय.49,रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (49) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, मुलगा मयूर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्यात आली आहे.

ब-हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु होते. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले. त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुण्यातून तो पळून जाताना मावळ तालुक्यातील एकाची दुचाकी घेऊन पसार झाला होता. त्यानंतर पुणे परिसरात काही काळ लपून बसला होता. त्यानंतर तो सोलापूर, सातारा या भागात काही ओळखीच्या लोकांकडे राहिला. त्यानंतर तो गुजरात, हैद्राबाद, कर्नाटक या राज्यात गपचूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता.

नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अ‍ॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर रवींद्र ब-हाटे पोलिसांना शरण गेला. त्यानुसार मंगळवारी (दि.6) दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
 

Web Title: RTI activist Ravindra Barhate remanded in police custody till 16 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.