‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:21 PM2019-06-14T19:21:42+5:302019-06-14T19:22:48+5:30

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घरापासून स्मशानभुमीपर्यंत पोहचविणे तसेच तिथून नातेवाईकांना पुन्हा घरी सोडण्याची सेवा पुरविली जाते.

RTO approval for 'Pushpak' bus | ‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता

‘पुष्पक’ला आरटीओची मान्यता

googlenewsNext
ठळक मुद्देपार्थिक नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून भरमसाठी शुल्कपीएमपीला दरवर्षी बसची रचना बदलण्यासाठी करावी लागणारी कसरत वाचणार

पुणे : पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीपर्यंत नेणाऱ्या ‘पुष्पक’ या बससेवेला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शववाहिनी म्हणून मान्यता दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही सेवा आरटीओच्या मान्यतेशिवाय सुरू होती. पण ‘आरटीओ’कडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून मागील काही वर्षांपासून प्रवासी वाहतुकीच्या बसचे शववाहिनीत रुपांतर करण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी तीन तर पिंपरी चिंचवडसाठी एक अशा एकुण ४ पुष्पक बस आहेत. याद्वारे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पार्थिव घरापासून स्मशानभुमीपर्यंत पोहचविणे तसेच तिथून नातेवाईकांना पुन्हा घरी सोडण्याची सेवा पुरविली जाते. त्यासाठी ६०० रुपये शुल्क आकारले जाते. बसचे शववाहिनीत रुपांतर करण्यासाठी पीएमपीला मोठा खटाटोप करावा लागतो. बसची संपुर्ण रचना बदलावी लागते. पण आरटीओकडून आतापर्यंत या शववाहिनीला मान्यता देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही सेवा बेकायदेशीरपणे सुरू होती. पण ही सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. 
पार्थिक नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून भरमसाठी शुल्क आकारले जाते. तसेच त्यामध्ये जागाही पुरेशी नसल्याने नातेवाईकांना इतर व्यवस्था करावी लागते. त्यामुळे अनेक जण पुष्पक सेवेलाच प्राधान्य देतात. पीएमपीच्या पुणे कार्यालयात त्यासाठी दररोज १० ते १२ दुरध्वनी येतात. यापार्श्वभुमीवर पीएमपी प्रशासनाने शववाहिनीला मान्यता देण्याची विनंती ‘आरटीओ’कडे केली होती. त्यानुसार ‘आरटीओ’कडूनही परवानगी मिळाल्याची माहिती ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांनी दिली. आरटीओ मान्यता दिल्याने पीएमपीला दरवर्षी बसची रचना बदलण्यासाठी करावी लागणारी कसरत वाचणार आहे. दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर डाव्या बाजुचे दोन्ही दरवाजे बंद करून मागील बाजूला दरवाजा करावा लागत होता. प्रमाणपत्रासाठी पुन्हा हा दरवाजा बंद करून डाव्या बाजूचे दरवाजे खुले करावे लागत होते. 


 

Web Title: RTO approval for 'Pushpak' bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.