साडेबारा लाखांचे बिल थकल्याने ‘आरटीओ’ अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:24+5:302021-07-16T04:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकवल्याने महावितरणने ...

RTO in the dark due to exhaustion of Rs 12.5 lakh bill | साडेबारा लाखांचे बिल थकल्याने ‘आरटीओ’ अंधारात

साडेबारा लाखांचे बिल थकल्याने ‘आरटीओ’ अंधारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकवल्याने महावितरणने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे गुरुवारी (दि. १५) आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.

गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज हे जनरेटरवर सुुरु असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आले नाही. गुरुवारी दुपारी जनरेटर मध्येही बिघाड झाल्याने आरटीओ कार्यालयात अंधार दाटला. त्यामुळे महावितरणने कारवाई केल्याचे लक्षात आले. आरटीओ कार्यालयाने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र थकबाकीची काही रक्कम भरल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे.

कोट

“जवळपास साडे बारा लाख रूपयांचे बिल थकले असल्याने महावितरणने ही कारवाई केली. आम्ही हे शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.”

-डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Web Title: RTO in the dark due to exhaustion of Rs 12.5 lakh bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.