आरटीओ कार्यालय येणार मोबाईल अ‍ॅपवर

By admin | Published: January 29, 2015 02:30 AM2015-01-29T02:30:57+5:302015-01-29T02:30:57+5:30

नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकरिता परिवहन विभागाने पादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) विविध कामांसाठी आॅनलाईन

The RTO office will come to the mobile app | आरटीओ कार्यालय येणार मोबाईल अ‍ॅपवर

आरटीओ कार्यालय येणार मोबाईल अ‍ॅपवर

Next

पुणे : नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याकरिता परिवहन विभागाने पादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) विविध कामांसाठी आॅनलाईन सेवा सुरू केली आहे. आता लवकर संपुर्ण आरटीओ कार्यालयच मोबाईल अ‍ॅपवर येणार आहे. त्यामुळे ‘आरटीओ’तील विविध कामे घरबसल्या मोबाईल अ‍ॅपवरून करता येतील. हे अ‍ॅप परिवहन आयुक्तालयामार्फत विकसित केले जात असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स टॅस्ट व आय.एल.एस. विधी महाविद्यालयाच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारावरील उपाययोजनांसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, महावितरणचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या वैजयंती जोशी व गव्हर्नन्स ट्रस्टचे अध्यक्ष एस. सी. नागपाल व्यासपीठावर उपस्थित होते.
वाडेकर यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीविषयी सांगताना तक्रारींचे निवारण करण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगतिले. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचेही वाडेकर म्हणाले. नागपाल यांनीही मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी प्रास्ताविक केले.
(प्रतिनिधी)

Web Title: The RTO office will come to the mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.