सुटीच्या दिवशीही आरटीओ सुरू राहणार

By admin | Published: October 21, 2015 01:01 AM2015-10-21T01:01:03+5:302015-10-21T01:01:03+5:30

दसऱ्याच्या दिवशी शहरात खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी येत्या गुकुवारी ( दि. २२) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नागरिकांना

RTO will continue on holidays | सुटीच्या दिवशीही आरटीओ सुरू राहणार

सुटीच्या दिवशीही आरटीओ सुरू राहणार

Next

पुणे : दसऱ्याच्या दिवशी शहरात खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी येत्या गुकुवारी ( दि. २२) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नागरिकांना नवीन वाहन क्रमांक मिळून वाहनाचा ताबा मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी केली जाते. मात्र, या दिवशी शासकीय सुटी असल्याने त्या वाहनांच्या नोंदणीची अडचण निर्माण होऊ शकते. तसेच सुटी असल्याने त्या दिवशीचा नोंदणीपोटी मिळणारा महसूलही उशिरा मिळतो. त्यामुळे आरटीओ प्रशासनाकडून या सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहेत.
त्यात संगमवाडी आणि आळंदी रस्ता येथील कार्यालय सुरू ठेवण्यात येणार असून, या दिवशीच नागरिकांना वाहन क्रमांक मिळावा, यासाठी विशेष यंत्रणाही उभारली जाणार आहे.

Web Title: RTO will continue on holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.