आरटीओला वर्षभरात १२९० कोटी

By admin | Published: April 2, 2016 03:38 AM2016-04-02T03:38:18+5:302016-04-02T03:38:18+5:30

वाहन नोंदणीत सुरू असलेली वाढ, नियमभंग वाहनचालकांकडून आकारण्यात येणारा दंड, विविध प्रकारचे कर, आकर्षक क्रमांक लिलाव, पर्यावरण करासह इतर वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या

RTO worth Rs. 1290 crores a year | आरटीओला वर्षभरात १२९० कोटी

आरटीओला वर्षभरात १२९० कोटी

Next

पुणे : वाहन नोंदणीत सुरू असलेली वाढ, नियमभंग वाहनचालकांकडून आकारण्यात येणारा दंड, विविध प्रकारचे कर, आकर्षक क्रमांक लिलाव, पर्यावरण करासह इतर वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षात तब्बल १२९० कोटी ४३ लाखांचा महसूल जमा झाला आहे.
मागील वर्षी हेच उत्पन्न सुमारे ११५७ कोटी ३६ लाख रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २४८ कोटींनी वाढ झाली आहे. एकट्या पुणे कार्यालयाच्या उत्पन्नात सुमारे १३० कोटींची वाढ झाली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
आरटीओ कार्यालयामार्फत वाहनचालकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या माध्यमातून पार पडलेल्या आर्थिक वर्षात १२५५ कोटी १२ लाखांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महसूल पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती,
सोलापूर आणि अकलूज या उपप्रादेशिक आरटीओ कार्यालयातून जमा झाला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
वर्षभरात पुणे शहरात ६८०
कोटी ९८ लाखांचा महसूल गोळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड कार्यालयात ३९८ कोटी ४६
लाखांचा महसूल, बारामती कार्यालयात ५९ कोटी ७० लाख, सोलापूर कार्यालयात ११३ कोटी ४९ लाख आणि अकलूज कार्यालयात ३६७ कोटी ८ लाखांचा महसूल जमा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वर्षभर विविध योजना तसेच सक्षमपणे कारवाई होत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाजाचे नियोजन केले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगले उत्पन्न मिळाले.
- जितेंद्र पाटील
(प्रादेशिक परिवहन अधिकारी)

Web Title: RTO worth Rs. 1290 crores a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.