बेकायदेशीर १२ ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:17+5:302021-07-25T04:09:17+5:30
पुणे : शहरात बेकायदेशीरपणे वाहनधारकांना चारचाकीचे प्रशिक्षण देणाऱ्या १२ मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओने कारवाई केली आहे. आरटीओकडे एमएस फॉर्म ...
पुणे : शहरात बेकायदेशीरपणे वाहनधारकांना चारचाकीचे प्रशिक्षण देणाऱ्या १२ मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर आरटीओने कारवाई केली आहे. आरटीओकडे एमएस फॉर्म नं. ११ न भरता तसेच ड्यूल कंट्रोल बसविण्याची परवानगी न घेता ही मंडळी वाहनधारकांना प्रशिक्षण देत होते. आरटीओच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरांत बेकायदेशीरपणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार आरटीओने भरारी पथक स्थापन करून चालकांना प्रशिक्षण देणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक शहरातील विविध भागात फिरून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली असता. बारा स्कूलचालकांकडे आवश्यक ती कागदपत्रे आढळून आली नाही. अधिक माहिती घेतली असता ड्रायव्हिंग स्कूल चालविण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित १२ वाहने जप्त करण्यात आले असून, त्याची नोंदणी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
------------------------
मोटार ड्रायव्हिंग स्कूलची पडताळणी सुरू
पुणे आरटीओच्या पटावर ४३८ मोटार ड्रायव्हिंग स्कूलची नोंद आहे. त्यापैकी १५० स्कूलचे कागदपत्रे तपासण्यात आपले आहे व ते स्कूल देखील सुरू आहे. उर्वरित स्कूलचे कागदपत्रे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.
कागदपत्रे तपासताना दिलेल्या पत्त्यांवर संबंधित स्कूल आहे की, नाही हे देखील पडताळले जात आहे. एखादे स्कूल बंद आढळून आले, तर स्कूल चालकास सात दिवसांची नोटीस देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्यास संगितले जाईल. त्यानंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल.
---------------------
आरटीओने १२ परवाना नसलेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई केली आहे. माझे नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी चारचाकीचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी स्कूल कायदेशीर आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी.
- डॉ अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
---------------