गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:25 AM2018-06-25T04:25:03+5:302018-06-25T04:25:07+5:30

उपहास, उपरोध, तिरकसपणा याचबरोबर मिस्कीलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या. या पाट्या म्हणजे पुणेकरांचा कॉपीराईटच जणू

Ruggedness, laughter and unprecedented response! | गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद!

गर्दी, रसिकता अन् अभूतपूर्व प्रतिसाद!

Next

पुणे : उपहास, उपरोध, तिरकसपणा याचबरोबर मिस्कीलपणा, अचाट कल्पनाशक्ती म्हणजे पुणेरी पाट्या. या पाट्या म्हणजे पुणेकरांचा कॉपीराईटच जणू. पुणेकरांची उत्तुंग रसिकता, अफाट गर्दी आणि अभूतपूर्व प्रतिसादाची अनुभूती रविवारी घेता आली. पुणेकरांच्या खुमासदार ‘पाटी’लकीची झलक लोकमततर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ प्रदर्शनात पहायला मिळाली.
एक-दीड तास रांगेत उभे राहून नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. ही रांग नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या फुटपाथपर्यंत पोहोचली होती.
एखाद्या प्रदर्शनासाठी रांगाच रांगा लावण्याची ऐतिहासिक घटना पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. सर्वांना लाभ घेता यावा, यासाठी प्रदर्शनाची वेळ ८ ऐवजी रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आली.
बौध्दिक कौशल्य, टोमणे आणि उपदेशांचे माहेरघर म्हणजे पुणे. इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ हे कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात २३ आणि २४ जून रोजी आयोजित करण्यात आले होते. ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने त्याचे आयोजन करण्यात आले. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत.

पुणेरी पाट्यांचे पुस्तक हवे!
पुणेरी पाट्यांचे पहिलेवहिले प्रदर्शन भरवून ‘लोकमत’ने इतिहास घडवला आहे. या पाट्यांच्या आठवणी कायमच्या मनावर कोरल्या जाव्यात यासाठी ‘लोकमत’ने या पाट्यांचे संकलन करुन ते पुस्तक स्वरुपात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी अनेक वाचकांनी केली.
सेल्फींचा पाऊस!
सर्व वयोगटातील पुणेकरांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आवडत्या पाटीसह सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.

Web Title: Ruggedness, laughter and unprecedented response!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.