Maharashtra election 2019 : राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा ; राज ठाकरेंचा प्रहार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 07:54 PM2019-10-18T19:54:45+5:302019-10-18T20:06:13+5:30

Maharashtra Election 2019 : सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यामुळेच ते मतदारांना गृहीत धरतात अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. कोथरूड येथील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

ruler party has over confident : Raj Thackeray | Maharashtra election 2019 : राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा ; राज ठाकरेंचा प्रहार 

Maharashtra election 2019 : राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा ; राज ठाकरेंचा प्रहार 

googlenewsNext

पुणे : सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यामुळेच ते मतदारांना गृहीत धरतात अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केली. कोथरूड येथील उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की , आज महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले इंटरनॅशनल बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे काढून टाकत आहेत. आज आमचा हा महापुरुष नसता तर आपण कुठे असतो. जर शिवछत्रपती, संभाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास सांगितला नाही तर पुढील पिढीला काय देणार आहोत.  भारताच्या इतिहासात कोणत्याही राज्याला नाही असा इतिहास महाराष्ट्राला आहे. या इतिहासाचं सरकार काय करत आहे तर किल्ल्यांवर लग्न, समारंभांना परवानगी देत आहेत. असे निर्णय म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण आहे.  त

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे : 

- मनमोहन सिंग मोठे अर्थतज्ज्ञ, विद्वान आहेत. ते म्हणाले तेव्हा काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितले की मंदीचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर होईल. त्याची सुरुवात झाली आहे. 

- २०१७साली नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी यांनी पन्नास दिवस द्या असे सांगितले होते. आता २०१९ सुरु आहे मात्र तरीही मंदी आहे. 

- पुण्याचे खासदार  ट्रॅफिकमध्ये अडकले तेव्हा बाणेरचा रस्ता रिकामा करायला निघाले, मग आम्ही अडकलो तर काय करायचं ?

-आज पुण्यासारख्या शहरात वाहनांचा सर्वाधिक धोका आहे. इथले रस्ते अपुरे आहेत. रस्त्यावर गाड्या पार्क होतात कारण मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जातात. 

-पोलिसांना हसण्यावारी नेतो. त्यांना मोकळीक नाही. त्यावर राज्य सरकार म्हणून नियंत्रण नाही. मंत्री दिव्याच्या गाडीतून फिरत राहणार. त्यांना काही फरक पडत नाही. उद्या बॉंम्ब ब्लास्ट झाल्यावर आठवणार की शहरांमध्ये बजबजपुरी आहे. मोबाईल फोनमध्ये मराठी ऐकू येत ते मनसेमुळे. नागरिकांना दरवेळी गृहित का धरता. बाहेरच्या राज्यातली लोकही आम्हीपोसायची आणि करही आम्ही भरायचे.  

-विरोधासाठी विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका नाही. नरेंद्र मोदींच्या भूमिका चुकल्या त्यावर प्रहार केले आणि ३७० साठी अभिनंदन करणारा मीच होतो. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते ३७० सोडून महाराष्ट्राचे तरुण, तरुणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी  कधी बोलणार?

-सत्त्ताधाऱ्यांची सभांसाठी आणि मेट्रोसाठी रात्रीतून झाडे छाटण्याची हिंमत कशी होते यामागचे कारण सत्ता डोक्यात जाते.

- आमचे उमेदवार स्थानिक आहेत, सत्तेची हवा डोक्यात न जाणारे आहेत. आणि ती गेलीच  तर टाचणी लावायला मी आहेच

Web Title: ruler party has over confident : Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.