कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:14+5:302021-02-23T04:15:14+5:30
पुणे : करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुणेकरांनी प्रशासन तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या ...
पुणे : करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुणेकरांनी प्रशासन तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने याबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करून सोमवारी (२२ फेब्रुवारी) आदेश जारी करण्यात येणार आहे.
राज्यात पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून शहरात काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करून आदेश जारी करण्यात येणार आहेत. पुणेकरांनी गणेशोत्सव तसेच नववर्ष स्वागतासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन प्रशासनाने शहरात निर्बंध लागू केले होते. पुणेकरांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी सहकार्य केल्याने त्याचे दृश्य परिणाम पाहायला मिळाले. पोलीस तसेच प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे करोनाबाधितांची संख्या कमी झाली.
करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले.