सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

By admin | Published: April 21, 2017 05:56 AM2017-04-21T05:56:45+5:302017-04-21T05:56:45+5:30

महापालिका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस

Ruling-opponents jumpy | सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

Next

पिंपरी : महापालिका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांना निलंबित करण्यात आले. यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष विरुद्ध विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे सदस्यांमध्ये जुंपली होती. ‘निलबंन मागे घ्यावे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी केली. तर कोणत्याही परिस्थिती निलंबन मागे घेणार नाही अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना शास्ती आकारण्याच्या विषयावरून सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत, मग पाचशेच स्क्वेअरफुटाला माफी का? असा सवाल विरोधकांनी केला. तर हजार स्क्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती नाही, त्यापुढील बांधकामे ही सामान्य माणसांची नाहीत, त्याच्याकडून शास्ती वसूल करा, अशी मागणी भाजपाने करून शास्ती वसुलीचा विषय मंजूर केला. यावरून गोंधळ घालणाऱ्या चौघांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई चुकीची असून ती माघे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर महापौर आणि पक्षनेते यांचा रिमोट दुसऱ्यांच्या हाती आहे, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे.
महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘संबंधितांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निलंबित केले आहे. कारवाई मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मीच रिमोट आहे.’’
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अपयश आल्याने राष्ट्रवादीचा हा प्रकार सुरू आहे. केवळ स्टंटबाजी आहे. माझा रिमोट कुणाच्याही हातात नाही. मी निर्णय घेण्यास समर्थ आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Ruling-opponents jumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.