दहा आणि पाचची नाणी बंदची अफवा

By Admin | Published: May 12, 2017 04:40 AM2017-05-12T04:40:28+5:302017-05-12T04:40:28+5:30

१० रुपयांची नाणी व ५ रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरल्याने व्यावसायिक ही नाणी व नोटा घेत नसल्याने

Rumor for the coins of ten and five | दहा आणि पाचची नाणी बंदची अफवा

दहा आणि पाचची नाणी बंदची अफवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : १० रुपयांची नाणी व ५ रुपयांच्या नोटा बंद झाल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरल्याने व्यावसायिक ही नाणी व नोटा घेत नसल्याने अनेक व्यावसायिकांमध्ये सभ्रमावस्था निर्माण झालेली आहे़ तसेच, ज्या नागरिकांकडे नाणी व नोटा आहेत, त्यांनी या नाण्यांचे व नोटांचे काय करावे? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे़
जुन्नर तालुक्यात सध्या १० रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात सुरू आहे़
छोटे व्यावसायिक ही नाणी स्वीकारत नाहीत़ वास्तविक, नाणी व नोटा बंद केल्याचे रिझर्व्ह बँकेचे कोणतेही आदेश नसताना १० रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा सर्वत्र आहे़ छोटे दुकानदार, भाजी व्यवसायिक, रिक्षाचालक इतर छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यासह काही पतसंस्थाचालकही १० रुपयांची
नाणी व ५ रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत़ रिझर्व्ह बँकेने १० रुपयांची नाणी किंवा ५ रुपयांच्या नोटा बंद केल्याचा कोणताही आदेश
काढलेला नाही. काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक १० रुपयांची नाणी व ५ रुपयांच्या नोटा बंद झाल्याची अफवा पसरवली आहे़ राष्ट्रीय व नागरी बँकांमध्ये ५ रुपयांच्या नोटा आणि १० रुपयांची नाणी स्वीकारत आहेत़
५ किंवा दहाच्या नोटा फाटक्या असतील, तर त्यासुद्धा स्वीकाराव्यात, असा आदेश रिझर्व्ह बँकेचा आहे़ चलनातील कोणतीही नोट किंवा नाणी बंद केल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेचा नसल्याने संबंधित नाणी किंवा नोटा स्वीकारण्यास मज्जाव केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे़

Web Title: Rumor for the coins of ten and five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.