पुणे शहरात लष्कराला पाचारण करणार ही अफवाच : पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:12 PM2020-05-09T14:12:37+5:302020-05-09T14:17:06+5:30
समाजात अफवा पसरवून संभ्रम आणि भीती निर्माण करत असल्यास त्यामागे कुणाचे षडयंत्र आहे याची चौकशी केली जाणार...
पुणे : सध्याच्या काळात जाणीवपूर्वक किंवा कुठल्या राजकीय हेतूने समाजात अफवा पसरवून संभ्रम आणि भीती निर्माण करत असल्यास त्यामागे कुणाचे षडयंत्र आहे याची चौकशी केली जाणार आहे. त्यात दोषी आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात लष्कराला पाचारण करणार ही अफवाच असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
सध्या शहरात मिलिटरीचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. नागरिक या मेसेजची कुठंली शहानिशा न करता तो व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल करत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गेल्या एक दोन दिवसांपासून शहरात मिलिटरीला पाचारण करणार ही अफवा जोरदारपणे व्हायरल झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर
लष्कराला पाचारण करणार अशी अफवा कुणी पसरवत असल्यास त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती पुण्याचे सहपोलिस आयुक्त डॉ. शिसवे यांनी दिली आहे.
.......................
शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलीस दलातील सर्व कर्मचारी ज्या निष्ठेने आणि समर्पित भावनेने काम करत आहेत त्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व समस्त नागरिकांनी केले आहे. कुणी विकृत मानसिकता तसेच कुठल्या राजकीय हेतूने अफवा पसरवत आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल. मात्र यासगळ्यात पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. - डॉ. रवींद्र शिसवे (सहआयुक्त पुणे पोलीस)