दौंडला महागाईच्या विरोधात धक्का मार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:14+5:302021-06-16T04:15:14+5:30
बहुजन मुक्ती पार्टीचे शेकडो कार्यकर्ते व महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने ...
बहुजन मुक्ती पार्टीचे शेकडो कार्यकर्ते व महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने या मागण्यांची दखल गांभीर्याने घेतली नाही, तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा याप्रसंगी आंदोलकांनी दिला. काँग्रेस, बीजेपीने देशाचे वाटोळे केले. तसेच मोदी सरकारवर टीका करणाऱ्या घोषणा आंदोलकांच्या वतीने देण्यात येत होत्या.
याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा संघटक गोरख फुलारी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या तालुका प्रभारी पुष्पा बनकर, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका युवा अध्यक्ष लखन जाधव, छत्रपती क्रांती सेनेचे अशोक मोरे, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक डॉ. दत्तात्रय जगताप, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा महासचिव नीलेश बनकर, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या पूजा शिंदे, रवीना दुरगुडे, पूनम जाधव यांच्यासह तालुक्यातून विविध संघटनेच्या, बचत गटांच्या महिला, युवा कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
--
फोटो क्रमांक : १५ दौंडला महागाईच्या विरोधात धक्का मार आंदोलन
फोटो ओळी : दौंड येथे तहसील कचेरी येथे महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.