आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नवरात्रोत्सवात दररोज २१ किमी रनिंग; डॉक्टर तरुणाचा अनोखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 21:18 IST2024-10-11T21:17:59+5:302024-10-11T21:18:38+5:30
डॉक्टर रोहन खवटे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज २१ किलोमीटर अंतर धावत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

आरोग्यविषयक जनजागृतीसाठी नवरात्रोत्सवात दररोज २१ किमी रनिंग; डॉक्टर तरुणाचा अनोखा उपक्रम
दौंड, पुणे : अलीकडील काही वर्षांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. व्यायाम आणि पोषक आहाराच्या अभावामुळे अशा समस्या उद्भवतात. हीच बाब लक्षात घेत पुणे जिल्हातील दौंड येथील डॉक्टर रोहन खवटे यांनी नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज २१ किलोमीटर धावत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
“बदललेल्या जीवनशैलीमुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. असे रुग्ण आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करुन रुग्णांना बरे करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची परकाष्ठा करतो. मात्र लोकांना आमची गरजच पडू नये आणि प्रत्येकाने तंदुरुस्त रहावे, यासाठी व्यायामाची गरज आहे. याबाबतच समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने मी नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज दौंड ते कुरकुंभ येथील फिरंगाई माता मंदिर असा २१ किलोमीटर अंतर धावण्याचा उपक्रम राबवला.” अशी माहिती डॉ. रोहन खवटे यांनी दिली आहे.
दरम्यान, “मला धावण्याची आवड असून मी आतापर्यंत अनेक मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला आहे,” असे डॉ. खवटे यांनी सांगितले.