व्यसनांच्या उच्चाटनासाठी धावली तरुणाई

By admin | Published: June 28, 2017 04:25 AM2017-06-28T04:25:11+5:302017-06-28T04:25:11+5:30

जागतिक अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त मुक्तांगण मित्र, पुणे शहर पोलीस आणि पुणे रनिंग यांच्यातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये

Running for the annihilation of addictions | व्यसनांच्या उच्चाटनासाठी धावली तरुणाई

व्यसनांच्या उच्चाटनासाठी धावली तरुणाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जागतिक अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त मुक्तांगण मित्र, पुणे शहर पोलीस आणि पुणे रनिंग यांच्यातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन तरुणांनी व्यसनाच्या उच्चाटनात सहभागी होण्याचा निर्धार केला. नॉर्कोटिक कंट्रोल ब्युरोचे संचालक संजयकुमार झा आणि गुन्हे शाखेचे उपआयुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ झाला.
विमाननगर येथील सिम्बॉयोसिस महाविद्यालयापासून १५, १०, ५ आणि ३ किलोमीटर अशा विविध टप्प्यांमध्ये झालेल्या या मॅरेथॉनमध्ये महिला, पुरुष, तरुण-तरुणी अशा सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. एव्हरेस्ट सर केलेल्या विमाननगर शाखेच्या सदस्या अपर्णा प्रभुदेसाई या वेळी उपस्थित होत्या. पुणे रनिंगतर्फे आफ्रिकेतील ७८ किलोमीटरच्या कॉम्रेड या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले सर्व कॉम्रेड देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
संजयकुमार झा म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. चित्रपटांमध्ये कलाकार देखील सर्रासपणे व्यसन करताना दिसतात आणि हेच कलाकार युवकांचे आदर्श असल्याने तरुणांकडून त्यांच्या व्यसनांचे अनुकरण केले जाते. त्यामुळे व्यसनांना जणू समाजमान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळेच व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. महिलाही व्यसनाधिनतेकडे झुकत असल्याचे आढळून येते.’’
डॉ. सुधीर हिरेमठ म्हणाले, ‘‘व्यसनाधिनतेचा वयोगट कमी होत चालला आहे. लहान वयातच मुलांना रोखता आल्यास भविष्यात रुद्ररूप धारण करू पाहणाऱ्या व्यसनाधिनतेला वेळीच थोपवता येईल. यासाठी व्यायामाची गोडी लावणेही आवश्यक आहे.’’

Web Title: Running for the annihilation of addictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.