थेरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे धावत्या मोटारीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:34 PM2018-05-08T14:34:52+5:302018-05-08T14:34:52+5:30
मोटारीच्या इंजिनमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली.
पिंपरी : शॉर्ट सर्किटमुळे धावत्या मोटारीला आग लागली. यामध्ये मोटार जळून खाक झाली. ही घटना थेरगाव येथे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी रात्री बाराच्या सुमारास एक मोटार (एम एच १४ सी ९७०८) चिंचवड गावाकडून थेरगाव पुलाकडे जात असताना खासगी रूग्णालयाजवळ मोटार आली असता, यांत्रिक बिघाड होवुन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे सुरुवातीला मोटारीच्या इंजिनमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवत मोटार रस्त्याच्या बाजूला उभी केली. तत्काळ तो बाहेर पडला. क्षणात संपूर्ण मोटारीने पेट घेतला. अग्निशामक विभागाला घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण अग्निशामक केंद्राचा एक बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु, या आगीत चारचाकी जळून खाक झाली.