पुण्यात चालत्या डंपरला लागली आग; वाहनाचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:25 IST2022-06-02T15:24:19+5:302022-06-02T15:25:04+5:30
सुदैवाने जिवितहाणी नाही...

पुण्यात चालत्या डंपरला लागली आग; वाहनाचे मोठे नुकसान
धायरी (पुणे):पुणे शहरातील वडगाव-धायरी येथील प्रयेजा सिटीजवळ एका डंपरला आग लागली. सनसिटी अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.
मिळालेली माहिती अशी की, डंपरच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन बाजूला घेऊन थांबविले. त्यानंतर डंपरच्या बोनेटला आग लागली. यानंतर एका नागरिकाने अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली असता, सनसिटी येथील अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उम्रटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग त्वरित आटोक्यात आणली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.