शिक्षणसंस्था चालविणे फार जिकिरीचे : मोहिते-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:38+5:302021-06-26T04:08:38+5:30
तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे उद्योगपती दीपचंदजी ओसवाल यांच्या सहकार्यातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शालेय इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. ...
तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे उद्योगपती दीपचंदजी ओसवाल यांच्या सहकार्यातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शालेय इमारत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. नारायण जाधव, उद्योगपती दीपचंद सोनराज ओसवाल, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, नगरसेवक आदित्य घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, सरपंच अनिल गावडे, भागचंद ओसवाल, अरुण पोद्दार, आश्विन पोद्दार, अशोक ओसवाल, प्रकाश ओसवाल, संजय ओसवाल, सुनील कटारिया, सचिन ओसवाल, अजय ओसवाल, रक्षित ओसवाल, गणपतराव बालवडकर, तान्हाजी चौधरी, संतोष पिंपरीकर, अध्यक्ष सुरेश वडगांवकर, अजित वडगांवकर, डॉ. दीपक पाटील, लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, प्राचार्य दीपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी संस्थेच्या झालेल्या विकासाचा आराखडा मांडला. सूत्रसंचालन पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे तर प्राचार्य दीपक मुंगसे यांनी आभार मानले.
आळंदी - देवाची (ता. खेड) येथे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शालेय इमारतीचे भूमिपूजन करताना मान्यवर.