ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे ही तर देशसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:18+5:302021-05-17T04:10:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देश कोरोनाशी झुंज देत आहे. काळ कठीण असला तरीही त्याला धैर्याने तोंड दिलें पाहिजे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देश कोरोनाशी झुंज देत आहे. काळ कठीण असला तरीही त्याला धैर्याने तोंड दिलें पाहिजे. देशात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा भारतीय रेल्वे खऱ्या अर्थाने जीवणरेखा ठरली. मागील आठ वर्षांपासून मी मालगाडी चालवीत आहे. मात्र ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे ही एक वेगळयाच प्रकारची अनुभूती दिली. ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच आहे त्याचा मला सार्थ अभिमान असल्याची भावना चालक सुधीर कुमार यांनी मांडली.
मंगळवारी रात्री उशिरा अंगुलहून लोणी काळभाेरला ऑक्सिजनचे चार टँकर दाखल झाले. सोलापूर विभागतील काष्टी येथून चालक सुधीर कुमार व गार्ड नागेश वाघमारे यांनी गाडीचा ताबा घेतला. ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणार असल्याने थोडं दडपण होतं मात्र त्याहुन जास्त आनंद होत होता. ऑक्सिजन एक्स्प्रेस अनेकांचे प्राण वाचणार त्यात आपलाही सहभाग होणार असल्याने माझ्यासाठी ही बाब अभिमानस्पद असल्याचे सुधीर कुमार म्हणाले.
गार्ड नागेश वाघमारे म्हणाले, माझ्या आयुष्यातील ही एक वेगळी घटना होती. जेव्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस वाहून नेण्यासाठी मला निवडले गेले. कारण ही एक असामान्य व वेगळा अनुभव देणारी ही खास ड्युटी होती. लोकांचा जीव वाचविण्यासाठी दिलेल्या आपल्या योगदानाचा मला व माझ्या कुटुंबाला फार अभिमान आहे.
देशभरात द्रव वैद्यकीय ऑक्सिजन पोचवून कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी देशाच्या प्रयत्नात रेल्वेचे निरंतर योगदान सुरूच आहे. यावेळी लोणी स्थानकचे व्यवस्थापक सुधीर सोनपरोते यांचे देखील मोठे योगदान आहे. रॅम्पची सोय करण्यापासून ते टँकर व्यवस्थित उतरविण्यात त्यांनी मोलाची जवाबदारी पार पाडली.