रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयच्या महिला आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 01:43 PM2021-01-27T13:43:35+5:302021-01-27T15:43:58+5:30

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने धायरी येथील चाकणकर यांच्या घराभोवती निदर्शने...

Rupali Chakankar will not be allowed to roam in Maharashtra; RPI's female aggressors | रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयच्या महिला आक्रमक

रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आरपीआयच्या महिला आक्रमक

googlenewsNext

धायरी: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या घरावर आरपीआयच्या वतीने आज बुधवारी निदर्शने काढण्यात आला.यावेळी चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी येथील घराभोवती सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरपीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत चाकणकर यांच्या घराच्या परिसरात निदर्शने केली. पोलिसांनी मुख्य रस्त्यावरच आरपीआयच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अडविल्याने पोलिसांच्या विरोधतही घोषणबाजी करण्यात आली. रूपाली चाकणकर यांच्या छायाचित्राला काळे फासून चपलाचे जोडे मारण्यात आले. यावेळी आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगीता आठवले म्हणाल्या की, लायकी नसणाऱ्या महिलेने केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्यावर वक्तव्य केल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. संगीता आठवले, नगरसेविका सुनीता वाडेकर, शकीला वाघमारे, संघमित्रा गायकवाड आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर, प्रतिभा तांदळे, चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी परिस्थीत हाताळत वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

याबाबत आमच्या लोकमत प्रतिनिधी ने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, काही कामानिमित्त मी सकाळीच घराबाहेर पडले असताना आज आरपीआय आठवले गटाचे काही लोक माझ्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाली , आझाद मैदानावरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याला मी माझा संवैधानिक अधिकार वापरून निषेध केला होता , घटनेने मला व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जर कुणी अपमान करत असेल तर गप्प बसणे हे माझ्या रक्तात नसल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Rupali Chakankar will not be allowed to roam in Maharashtra; RPI's female aggressors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.