Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:47 PM2021-11-23T13:47:32+5:302021-11-23T14:35:39+5:30

रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो

Rupali Patil No idea of quitting MNS Only the well wishers of the party will be forced to find new alternatives | Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

googlenewsNext

पुणे : मनसेमधीलच काही माझे हितचिंतक माझ्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कान भरू लागले आहेत. राजकारणात स्त्रीला टार्गेट केलं जातय. तेच आता मनसेत माझ्याबाबत घडू लागले आहे. मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा अजिबातच विचार नाही. पण मला या रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो. असे मत मनसे पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.     

''मला २०१७ मला भाजपची खुली ऑफर होती. तेव्हा मोदी लाटेत मनसे कडून हारही झाली. तरी मी पक्षातच राहिले. २०१९ ला आमदारकीच तिकीट कापलं गेले तरी सुद्धा मी पक्ष बदलला नाही. परंतु माझे जे पक्षातील हितचिंतक आहे. तेच लोक राजसाहेबांचे कान भारतात. त्यांची नावे, डेटा माझ्याकडे आहे. मी राजकारणात आल्यापासून सगळ्या गोष्टी कायदेशीर करते. त्यांना वेळ आल्यावर दाखवून देणारच आहे. एकदा माझी तार हलली की नक्कीच नाव जाहीर करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.''

''मी दोन दिवसापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर एक वकील म्हणून फेसबुक पोस्ट केली होती. त्यात निरीक्षण नोंदवण्यासाठी केलेली होती. त्यात पक्षाची भूमिका नसल्याचेही मी सांगितलं होत. त्यावरूनच पक्षातील काही रिकामटेकड्या मंडळींनी रुपालीच्या विरुद्ध कान भरण्याचा प्रकार केला असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.'' 

तुम्ही राष्ट्रवादीत जाणार आहे का? 

''एक तर ही चर्चा आमच्या पक्षातील विरोधकांनी रंगवली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे तीन महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांचा मला सन्मान आणि अभिमान आहे. मी शरद पवार आणि अजितदादांना मध्यंतरी भेटले होते. त्यांना भेटणे चुकीचे नाही. अजित पवार पालकमंत्री आहेत. पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांनाच भेटणार. उद्या मी शिवसेनेच्या नेत्याला भेटल्याचा फोटो टाकल्यावर तुम्ही असच म्हणणार का? की रुपाली आता शिवसेनेत जाणार आहे.'' 

मनसेतही महिलांना टार्गेट केले जाते 

''माझ्या ऑफिसला अजूनही दररोज १०० लोक येतात. मी आज तुमच्या समोर आहे. आतापर्यंत पक्ष सोडण्याचा कोणताही विचार केला नाही. येणाऱ्या काळात मला असंच त्रास होणार असेल. मला राजकारण बंद करावा लागेल किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला हीच लोकं पर्याय शोधायला लावतील. राजकारणात महिलांना पुढे जाऊन दिले जात नाही. मनसेतही महिलांना टार्गेट केले जात आहे. याबाबत राज साहेबांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''

Web Title: Rupali Patil No idea of quitting MNS Only the well wishers of the party will be forced to find new alternatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.