"पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच..." रुपाली पाटील ठोंबरेंची नारायण राणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:19 PM2022-06-24T19:19:14+5:302022-06-24T19:29:40+5:30

पाटील म्हणाल्या, आम्हाला गुंड बनायला भाग पाडू नका....

Rupali Patil Thombre criticizes Narayan Rane It's raining the frogs will come out | "पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच..." रुपाली पाटील ठोंबरेंची नारायण राणेंवर टीका

"पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच..." रुपाली पाटील ठोंबरेंची नारायण राणेंवर टीका

Next

पुणेशिवसेना आमदार बंडखोरी प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. ट्विट करत त्यांनी या बंडखोरीला कारणीभूत ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करून दिलीये. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून राणेंवर टीका केली जात आहे. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, नारायण राणे यांची भूमिका भाजपची भूमिका आहे का? नारायण राणेंसारख्यांच्या धमकीला कोणी भीक सुद्धा घालत नाही. स्वतःला ईडीपासून वाचवण्यासाठी राणे हे भाजपमध्ये गेले असल्याचं जगाला माहिती आहे. राणेंना वाटत असेल ते स्वतः फार मोठे गुंड आहेत, आम्हाला गुंड बनायला भाग पाडू नका. बापाला धमकी देण्याचं काम करू नका. राजकारणात बदनाम आहात, नात्यात होऊ नका. पावसाळा आहे, बेडकं बाहेर येणारच, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

काय आहे नारायण राणेंचे ट्वीट-

पहिल्या ट्विटमध्ये राणे म्हणाले, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

पुढच्या एका ट्विटमध्ये राणे म्हणाले, आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.

Web Title: Rupali Patil Thombre criticizes Narayan Rane It's raining the frogs will come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.