रूपी बँकेच्या विलीनीकरणाचा विषय लोकसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:47+5:302021-07-28T04:11:47+5:30
पुणे: आर्थिक अडचणींमूळे गोत्यात आलेल्या रूपी बँकेबाबत मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. खासदार गिरीश बापट यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे ...
पुणे: आर्थिक अडचणींमूळे गोत्यात आलेल्या रूपी बँकेबाबत मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. खासदार गिरीश बापट यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे याबाबत विचारणा केली.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेला यात लक्ष घालण्याचे आदेश द्यावेत, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रूपी बँकेचे विलीनीकरण करावे, अशी मागणी बापट यांनी सितारामण यांच्याकडे केली.
बापट म्हणाले, "पुण्यातील रुपी बँक १०८ वर्ष जुनी आहे. लोकमान्य टिळक तिच्या संस्थापकांपैकी एक आहेत. तब्बल ४ लाख खातेदारांच्या ठेवी बँकेत आहेत. १२०० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. तत्कालीन लोकांनी एक एक रूपया जमा करत बँक सुरु केली आहे.
आज बँक अडचणीत आली आहे, त बँकेत ठेवी असणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांची संख्या बरीच आहे. ते सगळेच आर्थिक अडचणीत आले आहेत. वारंवार याबाबत संसदेत प्रश्न विचारले, मात्र त्याबाबत काहीच हालचाल होत नाही. ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीवेतनधारक, मध्यवर्गीय नोकरदार यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून रूपी बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीनीकरण करून घ्यावे.