रुपीनगराला ढोल-ताशांच्या गजरात फेरी
By admin | Published: June 16, 2015 12:15 AM2015-06-16T00:15:28+5:302015-06-16T00:15:28+5:30
न्या शाळा क्रमांक २/२, निगडी, रुपीनगर या शाळेत सोमवारी सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विविध
पिंपरी : कन्या शाळा क्रमांक २/२, निगडी, रुपीनगर या शाळेत सोमवारी सकाळी जनजागृती फेरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विविध घोषणा देऊन प्रभागातून पालक, विद्यार्थी यांचे प्रबोधन करण्यात आले.
नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, नगरसेवक तानाजी खाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुकेश कांबळे, कार्यकर्त्या सिंधू सरोदे, उपमुख्याध्यापिका शैलजा मोरे यांनी पहिलीतील मुलींचे स्वागत केले. मुलांचे औक्षण करून फुले, फुगे दिले. सुगंधी अत्तर लावण्यात आले. खाडे, बोऱ्हाडे यांनी नवागतांना चौकलेट, फुले देऊन स्वागत केले. पुस्तकवाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.
‘सारे शिकू या, पुढे जाऊ या, मुलांचे शिक्षण प्रगतीचे लक्षण, १,२,३,४ शाळेला चला, शाळेला चला’ अशा घोषणा फेरीत देण्यात आल्या. शिक्षण मंडळाचे प्रसिद्धिपत्रक परिसरात वाटप करण्यात आले. कल्पना तळेकर यांनी मुलींकडून पुस्तकाविषयी प्रतिज्ञा म्हणून घेतली. पुस्तकाची काळजी घेईन, अभ्यास करेन, असे अभिवचन घेतले. तळेकर यांनी महापालिका शाळेत मोफत साहित्य कोणकोणते मिळते, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संगणक कक्ष, ग्रंथालय या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. संतोष बेंद्रे यांनी आभार मानले.
प्रथमदिनी विद्यार्थ्यांचे स्वागत
पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय सहयोगनगर या शाळांमध्ये प्रथमदिनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल गवळी, संचालक बाळासाहेब सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे दीपक मोढवे, व्याख्याते प्रा. दि. वा. बागुल, प्राथमिक मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे, माध्यमिक मुख्याध्यापक राहुल गवळी, शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.
पाठ्यपुस्तकांचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत ढोल-ताशांच्या गजरात, रांगोळी काढून, फुले व फुग्यांची सजावट करून करण्यात आले. योगशिक्षक साहेबराव गारगोटे यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखविली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी खाऊचे वाटप झाले.
यशस्वी विद्यालयाची प्रभातफेरी
पिंपरी : यशस्वी प्राथमिक विद्यालयात मुलांचे स्वागत करण्यात येऊन प्रभातफेरी काढण्यात आली. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष देवकाते, मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी मार्गदर्शन केले. प्रभातफेरीसाठी अनिल हंडाळ, प्रकाश भोजगुडे, रविराज वेताळ, रोहिदास धिंदळे, विठ्ठल धिंदळे, लक्ष्मण भांगरे, माधुरी शिंदे, भाग्य गायकवाड, कांचन कानवडे यांनी नियोजन केले.
(प्रतिनिधी)