ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 02:05 AM2019-01-31T02:05:36+5:302019-01-31T02:06:31+5:30

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.

Rural areas cause sensory culture to survive: Indorekar | ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

googlenewsNext

तळेघर : ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली आहे. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे अनाथांचे नाथ परमपूज्य बाळयोगी मच्छिंद्रनाथमहाराज व परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, की ग्रामीण भागात आजही संस्कारमय संस्कृती टिकून आहे. ग्रामीण भागामध्ये वाटेने जाणाऱ्या-येणाºयांना घासभर अन्न व तांब्याभर पाणी दिले जाते. प्रेमाने बोलले जाते. ग्रामीण भागामध्ये आजही माणुसकी टिकून आहे. याच्या उलट शहरी भागामध्ये कुत्र्यांना ताटाजवळ घेऊन जेवण केले जाते; परंतु दारामध्ये आलेल्या माणसाला तांब्याभर पाणीसुद्धा दिले जात नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोक सुखी व समाधानी आहेत.या सप्ताहातमध्ये हभप भीमाजीमहाराज आंबेकर, हभप कांताराममहाराज इष्टे यांची हरिप्रवचने व हभप बाळकृष्णमहाराज दळवी (श्रीगोंदा), हभप भास्करमहाराज जगदाळे, हभप भरत अनंतमहाराज, हभप गोकुळमहाराज पिंगळे, परमपूज्य बाळयोगी निर्मळनाथमहाराज यांची हरिकीर्तने झाली.

Web Title: Rural areas cause sensory culture to survive: Indorekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे