ग्रामीण रुग्णालयाला नगरपालिकेचा विरोध
By Admin | Published: November 14, 2014 11:38 PM2014-11-14T23:38:29+5:302014-11-14T23:38:29+5:30
जेजुरी नगरपालिकेच्या जागेत राज्य शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहात आहे. सध्या या इमारतीचे 7क् टक्के काम पूर्ण झालेले आहे.
जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या जागेत राज्य शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहात आहे. सध्या या इमारतीचे 7क् टक्के काम पूर्ण झालेले आहे. अशातच पालिकेने जागेचा प्रश्न पुढे करून तोंडी आदेशाद्वारे हे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीतील गट नं. 187 (सिटी सव्र्हे नं. 1564 बंगाली पटांगण) मधील 66 गुंठे जागेत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम दीड वर्षापूर्वी सुरू झाले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात हे काम पूर्ण होऊन रुग्णालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांत नाराजी आहे. अधिक माहिती घेतली असता इमारतीच्या पाणीपुरवठय़ाची टाकी आणि शवविच्छेदन केंद्राचे काम पालिकेकडून थांबविले आहे. पालिकेने मोजून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम केले जात असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणो असल्याचे समजते. यावर आरोग्य विभागाकडून भूमी अभिलेख कार्यालयाला जागा मोजून देण्याविषयीचे पत्र दिल्याचे समजते.
4जेजुरीत 2क्क्6मध्ये ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाल्यानंतर नगरविकास विभागाच्या आदेशानुसार 2क्क्9मध्ये जेजुरी नगरपालिकेची ही जागा आरोग्य विभागाला देण्यात आली. त्यानंतर 2क्11मध्ये या जागेचा रीतसर भाडेकरार करून 66 गुंठे जागेवर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झालेले आहे. सार्वजनिक विभागामार्फत खासगी ठेकेदाराने या ठिकाणी सुमारे 4 कोटी 18 लाख रुपये खचरून रुग्णालयाची अद्ययावत इमारत, 33 खाटांचे अंतर व बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवास असे सुसज्ज रुग्णालय उभे करणार आहे. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडत अंतिम टप्प्यात आलेल्या या कामाला पालिकेनेच खो घातला आहे. एकदा अधिकृतरीत्या जागा मोजून दिल्यानंतर ही नव्याने जागेचा प्रश्न उपस्थित करून पालिका काय मिळवणार आहे, याचीच चर्चा शहरात आहे.