ग्रामीण महिलांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे; कांचन कुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:16+5:302021-09-09T04:14:16+5:30
यवत येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कांचन कुल यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा रायकर, ...
यवत येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कांचन कुल यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मनीषा रायकर, कोमल कदम, अश्विनी बंड, रूपाली बंड, शिल्पा दोरगे, विद्या कासवेद, गणेश साळुंखे, युवराज बंड, प्रमोद बंड आदी मान्यवरांसह महिला उपस्थित होत्या. यवत व कासुर्डी येथील महिलांसाठी पार्लर व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना कांचन कुल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. गणेश साळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
080921\img-20210904-wa0075.jpg
फोटो ओळ :- यवत येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन करताना कांचन कुल व इतर मान्यवर