अपघातग्रस्त टँकरमधून डिझेल नेण्यासाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:09 AM2021-05-17T04:09:27+5:302021-05-17T04:09:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उंडवडी कडेपठार: बारामतीकडे निघालेल्या डिझेल टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाल्याची घटना शनिवारी (दि. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उंडवडी कडेपठार: बारामतीकडे निघालेल्या डिझेल टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाल्याची घटना शनिवारी (दि. १५) गोजुबावी रस्त्यावरील आटोळेवस्ती येथे घडली. अपघातानंतर टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाली. टँकर उलटल्याची बातमी कळताच डिझेल नेण्यासाठी स्थानिकाची झुंबड उडाली होती. जखमींना मदत करण्याऐवजी नागरिकांनी बादल्या, हंडे, ड्रम मिळेल त्या साधनाद्वारे डिझेल लंपास केले. काहीजणांना
मोठी साधने मिळाली नव्हती, म्हणून त्यांनी डबे देखील डिझेल भरून घेण्यासाठी आणले होते.
हे डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील पाणी ओतून दिले आणि पाण्याच्या जागेवर डिझेल भरून घेतले. अर्थात तोपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे आता घरातील या नेऊन ठेवलेल्या डिझेलवर सरकारी अधिकारी काय कारवाई करणार, याची उत्सुकता आहे. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साह्याने टँकर सुरळीत करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फोटो ओळ: गोजुबावी येथे टँकरच्या अपघातून सांडलेले डिझेल मिळेल त्या भांड्यातून वाहून नेताना नागरिक.