लस आणण्याची घाई अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:27+5:302020-12-06T04:10:27+5:30
डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत ...
डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार
पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात लस येण्यासाठी दोन-तीन महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. लस उशिरा आली तरी चालेल पण ती सुरक्षित असायला हवी. लस आणण्यात होत असलेली घाई अयोग्य आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यावेळी उपस्थित होते.
डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, प्रियांका चौधरी, अमोल काळे, प्रमिला लोहकरे, क्रांतीकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. भोंडवे म्हणाले, “सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी १३० कोटी लोकसंख्येपैकी किमान ९१ कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे यावर भर देणे गरजेचे आहे.” गणेश चप्पलवार यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले
----------------------------