‘मतदारजागृती’स गर्दी भाजपाचीच

By Admin | Published: September 28, 2016 04:40 AM2016-09-28T04:40:38+5:302016-09-28T04:40:38+5:30

मतदार जनजागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यास भाजपा कार्यकर्त्यांची अधिक गर्दी होती.

The rush of 'voter awareness' is the BJP | ‘मतदारजागृती’स गर्दी भाजपाचीच

‘मतदारजागृती’स गर्दी भाजपाचीच

googlenewsNext

पिंपरी : मतदार जनजागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यास भाजपा कार्यकर्त्यांची अधिक गर्दी होती. त्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जागा मिळाली नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
स्थायी समिती सभागृहात झालेल्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना व आरपीआय महायुती आघाडीच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसे गटनेते अनंत कोऱ्हाळे, राजीव भालेराव, मोहन आडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामदास मोरे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सारंग कामथेकर, राष्ट्रीय वाल्मीकी सेना पार्टीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह छाजछिडक, महासचिव पुरणचंद बिडलान, बहुजन समाज पार्टीचे अशोक गायकवाड, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, चंद्रकांत खोसे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, सहकार विभागाचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे म्हणाले, ‘‘पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारनोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करून घ्यावी.’’
सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘‘शहरातील नोंदणीकृत गृह निर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिवांचे सहकार्य मतदारनोंदणीसाठी घेण्यात येईल. शहरात चार हजारांपेक्षा अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्याने मतदारनोंदणी करणे आवश्यक आहे. महापालिकेने सहा क्षेत्रीय कार्यालये, मतदारनोंदणी अधिकाऱ्यांचे कार्यालये व चौदा महाविद्यालयांत मतदारनोंदणी केंद्र सुरू केले आहे. ’’(प्रतिनिधी)

बैठकीस विविध पक्षांच्या शहराध्यक्षांशिवाय अन्य कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. तसेच महापौर, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांना आणि काही अधिकाऱ्यांनाही या बैठकीची माहिती दिली नव्हती. तसेच काही पदाधिकारी या बैठकीस गेले असताना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने बैठकीतून बाहेर पडले. याबाबत मंगला कदम म्हणाल्या, ‘‘बैठकीस राजकीय पक्षांच्या शहरप्रमुखांशिवाय अन्य लोक अधिक होते. महापौर, पक्षनेत्यांना या बैठकीची माहिती दिली नाही. ही चुकीची बाब आहे.’’

Web Title: The rush of 'voter awareness' is the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.