रायरी गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:24+5:302021-02-26T04:12:24+5:30
पुणे येथील अल्पबचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच वर्षा किंद्रे, माजी ...
पुणे येथील अल्पबचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यमान सरपंच वर्षा किंद्रे, माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे. ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भोर तालुक्यातील एकूण १५५ ग्रामपंचायती असून, या सर्वांमधून २०१८/१९ या सालातील सुंदर गाव पुरस्कार हा रायरी गावाला मिळालेला आहे पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली होती यामध्ये स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन सरपंच सूर्यकांत किंद्रे, ग्रामसेवक पदमाकर डोंबाळे, उपसरपंच ग्रामस्थ इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गाव स्तरावर राबवलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा आरोग्य,शिक्षण,कचरा,सांडपाणी,आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सन २०१८- १९ सालचा सुंदर गाव पुरस्कार रायरी गावाला मिळाला आहे.
२५ भोर रायरी
स्मार्ट ग्राम पुरस्कार देताना उपमुख्यमंत्री आजित पवार, जि.प. अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे व इतर.