एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:25+5:302021-03-22T04:10:25+5:30

स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, पुण्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ...

S. Balan Trophy T20 cricket tournament from tomorrow | एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

Next

स्पर्धेचे संचालक आणि पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन यांनी सांगितले की, पुण्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ८ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माणिकचंद ऑक्सिरिच यांनी स्पर्धेला पाठिंबा दिला असून स्पर्धेचे संयोजन स्पोट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे करण्यात आले आहे.

कोविड-१९ या महामारीच्या संकटानंतर आमच्या वतीने पहिल्यांदाच अशी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा पुण्यातील मुलांना संधी असून उज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे, असेही पुनित बालन म्हणाले.

स्पोट्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत गेम चेंजर्स, पीआयओसी हरीकेन्स, स्पायडर स्पोर्टस, किंग्ज स्पोर्ट्स क्लब, ईगल्स क्रिकेट क्लब, सेंन्च्युरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनित बालन ग्रुप व जीएसटी अँड कस्टम संघ या आठ निमंत्रित संघांमध्ये स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत एकूण दीड लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या संघाला ४१ हजार रूपये व करंडक मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ३१ हजार रूपये आणि करंडक असे पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यष्टिरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी पाच हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा सन्मान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी मराठी सिनेकलाकार आकाश ठोसर यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धा आयोजनामध्ये कोविड-१९ सुरक्षितचे सर्व नियम आणि खेळाडूंची सुरक्षितता या नियमांचे सर्व पालन करण्यात येणार आहे.

Web Title: S. Balan Trophy T20 cricket tournament from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.