स. नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह ‌‘सखा‌’ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:14 PM2024-09-22T23:14:21+5:302024-09-22T23:15:04+5:30

Purushottam Karandak 2024: पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. 21) आणि रविवारी (दि. 22) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. 

S. No. 1532 Ekankika won Purushottam Karandak 2024; Jairam Hardikar Memorial to 'Sakha' natya pune cultural news | स. नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह ‌‘सखा‌’ला

स. नं. 1532 एकांकिकेस पुरुषोत्तम करंडक; जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह ‌‘सखा‌’ला

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 59 व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या बस नं. 1532 एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला 5001 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. 

सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेले जयराम हर्डीकर स्मृतिचिन्ह व 5001 रुपयांचे पारितोषिक मएसोचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड करिअर कोर्सेसे (आयएमसीसी) सादर केलेल्या सखा या एकांकिकेने पटकाविले. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि 3001 रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‌‘पाटी‌’ एकांकिकेने तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि 2001 रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस्‌‍ ॲन्ड सायन्स कॉलेज अहमदनगरच्या ‌‘देखावा‌’ या एकांकिकेला जाहीर करण्यात आला. 

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार (दि. 21) आणि रविवारी (दि. 22) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. पुरुषोत्तम बेर्डे, शुभांगी गोखले, गिरीष परदेशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

पुरूषोत्तम करंडक निकाल 

स्पर्धेचा निकाल : सांघिक प्रथम : बस नं. 1532 (गरवारे वाणिज्य महाविद्यालय) सांघिक द्वितीय : पाटी (विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती) सांघिक तृतीय : देखावा (न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर) सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका : सखा (म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक : ओम चव्हाण (सखा, आयएमसीसी महाविद्यालय) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : पवन पोटे (देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर) उत्तेजनार्थ विद्यार्थी लेखिका : सई काटकर आणि वेदिका कुलकर्णी (11,111, फर्ग्युसन महाविद्यालय) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : यश मेंगडे (बस. नं. 1532, गरवारे वाणिज्य महाविद्यालय) उत्तेजनार्थ दिग्दर्शन : ऋषिकेश सकट (देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर) उत्तेजनार्थ दिग्दर्शन : सुबोधन जोशी (पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती) सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिनय नैपुण्य : सुजल बर्गे (भूमिका अरविंद, एकांकिका - पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय) अभिनय नैपुण्य (अभिनेता) : यश पत्की (भूमिका - सदा मोरे, एकांकिका - बस नं. 1532, गरवारे वाणिज्य महाविद्यालय) अभिनय नैपुण्य (अभिनेत्री) : श्रद्धा रंगारी (भूमिका - सुवर्णा, एकांकिका - पाटी, विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय) वाचिक अभिनय नैपुण्य : पवन पोटे (शंकर, एकांकिका - देखावा, न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर) उत्तेजनार्थ (अंतिम फेरी) : अभिनय : ओम चव्हाण (सुदामा/फडतरे, एकांकिका - सखा, आयएमसीसी) अनामिका मदने (ज्ञानेश्वरी, एकांकिका - बिजागरी, पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय) तन्वी खाडिलकर (प्रिया, एकांकिका - पार्टनर, स. प. महाविद्यालय) शुभ्रा जाधव (माय, एकांकिका - बिजागरी, पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय) राखी गोरखा (आत्या, एकांकिका - देखावा, न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर) समृद्धी कुलकर्णी (बारकी, एकांकिका - बस नं. 1532, गरवारे वाणिज्य महाविद्यालय) व्योम कुलकर्णी (भूषण, एकांकिका - पार्टनर, स. प. महाविद्यालय) वैष्णवी भिडे (आनंदीबाई, एकांकिका - तृष्णा चक्र, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर) प्रद्युम्न उमरीकर (सचिन, एकांकिका - 11,111, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, स्वायत्त) पार्थ दीक्षित (माधव, एकांकिका - पार्टनर, स. प. महाविद्यालय) सर्वोत्कृष्ट आयोजित संघ : भगीरथ करंडक : पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (एकांकिका अय)

Web Title: S. No. 1532 Ekankika won Purushottam Karandak 2024; Jairam Hardikar Memorial to 'Sakha' natya pune cultural news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे