संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘स. प. महाविद्यालय’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 06:02 PM2018-02-24T18:02:36+5:302018-02-24T18:02:36+5:30

फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला.

S P college, Pune first in state lavel sanskrit drama competition | संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘स. प. महाविद्यालय’ प्रथम

संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘स. प. महाविद्यालय’ प्रथम

Next
ठळक मुद्देअभिनयात आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे यांचा प्रथम तर सुधर्म दामलेचा दिग्दर्शनात प्रथम क्रमांक‘संगीत जय जय गौरीशंकर’ या  विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद

पुण : फर्ग्युसन विद्यालय आयोजित रा. ना. दांडेकर संस्कृत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत स. प. महाविद्यालयाच्या 'उमारंग' या एकांकिकेने सांघिक प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय तीन वैयक्तिक पारितोषिकेही विद्यार्थ्यांनी प्राप्त केली. अभिनयात आकांक्षा ब्रह्मे व दर्शन वझे यांनी प्रथम तर  सुधर्म दामले याने दिग्दर्शनात प्रथम क्रमांक मिळविला.    
‘संगीत जय जय गौरीशंकर’ या  विद्याधर गोखले यांच्या मूळ नाटकाचा संस्कृत अनुवाद व रंगावृत्ती संस्कृत विभागाने सादर केली व याकरिता विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर यांचे मोलाचे सहकार्य आणि महाविद्यालयाच्या  संस्कृत विभागाच्या डॉ.भारती बालटे यांचे मार्गदर्शन लाभले. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, उपप्राचार्य डॉ. अशोक चासकर, उप संचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक केले.

Web Title: S P college, Pune first in state lavel sanskrit drama competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.