\Sʻजीतोʼ युथ विंगचा 'प्लाझ्मा ड्राइव्हʼ देतोय जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:56+5:302021-05-05T04:19:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ʻजैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जीतो)ʼ, पुणे या संस्थेच्या युथ विंग तर्फे प्लाझ्मा ड्राइव्हचा उपक्रम सुरु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ʻजैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जीतो)ʼ, पुणे या संस्थेच्या युथ विंग तर्फे प्लाझ्मा ड्राइव्हचा उपक्रम सुरु करण्यात आला असून, ६५ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
प्लाझमा ड्राईव्ह उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, सचिव पंकज कर्नावट, सहसचिव चेतन भंडारी, जीतो पुणे युथ विंगचे अध्यक्ष गौरव नहार, मुख्य सचिव प्रितेश मुनोत, युथ विंगचे गौरव बाठिया, नीलेश दर्डा, कौशभ धोका आणि युथ विंगचे सर्व सदस्य, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झोनचे मुख्य सचिव अजय मेहता, सिद्धी फाउंडेशनचे मनोज छाजेड व अध्यक्ष ललित जैन, डायग्नोपिनचे प्रफुल्ल कोठारी, ससून रुग्णालयाचे डॉ. शंकर मुगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य सचिव, पंकज कर्नावट यांनी महामारीच्या काळात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे आभार मानले.
नीलेश दर्डा यांनी या अभियानाची माहिती दिली. गौरव बाठिया यांनी सूत्रसंचालन केले.
कोट
संकट मोठे असतां एकत्र येऊन त्याचा मुकाबला करणे आवश्यक असते. जीतो पुणेच्या माध्यमातून हजारो हात एकत्र येऊन कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. याचे कौतुक आहे. सार्वजनिक संकटाच्या काळात कशा प्रकारे काम करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून जीतो पुणेकडे सध्या पाहिले जात आहे.
- विजय भंडारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, जीतो अपेक्स.
खरे तर, पुणे शहराचा इतिहासच सेवाभावी वृत्तीचा आहे. त्यामुळे जीतो पुणे देखील या गौरवशाली सेवाभावी वृत्तीला समर्पणाच्या भावनेने जोपासत काम करीत आहे.
- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष, जीतो, पुणे