पैशांसाठी केला साडूचा खून

By admin | Published: August 28, 2015 04:34 AM2015-08-28T04:34:03+5:302015-08-28T04:34:03+5:30

उसने पैसे घेण्यासाठी आलेल्या साडूचा खून करुन मृतदेह भुलेश्वर घाटात फेकून देऊन संबधित व्यक्ति हरवला असल्याचा बनाव केल्याचा प्रकार तब्बल २१ दिवसांनी

Saadoo's blood for money | पैशांसाठी केला साडूचा खून

पैशांसाठी केला साडूचा खून

Next

यवत : उसने पैसे घेण्यासाठी आलेल्या साडूचा खून करुन मृतदेह भुलेश्वर घाटात फेकून देऊन संबधित व्यक्ति हरवला असल्याचा बनाव केल्याचा प्रकार तब्बल २१ दिवसांनी उघडकीस आला आहे. खून करते वेळी यामारेकऱ्यांबरोबर असलेल्या टेम्पोचालकाने या घटनेची माहिती उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस चौकी येथे जाऊन संगितल्यानंतर उघडकीस आला आहे. चंद्रसेन महादेव गुटे ( वय ३५, रा.वाकरवाडी, ता. व जि. उस्मानाबाद) असे खुन झालेल्यांचे नाव आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी उमेश महादेव शिंदे (वय २५), धनंजय भागवत पवार (वय२३), अनंता भजनदास सुरवसे (वय ३८), गोविंद पांडुरंग शिंदे (वय ३०, सर्व रा़ वाकरवाडी, ता़ व जि़ उस्मानाबाद) यांना अटक केली आहे़ यातील आणखी एक आरोपी गणेश शिंदे हा फरार आहे़
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रसेन गुटे हा त्याची पत्नी माणिका गुटे हिच्यासह त्याचे साडू गणेश पांडुरंग शिंदे (सध्या रा. माळशिरस, पुरंदर, मूळ रा.वाकड़वाडी, जि.उस्मानाबाद) यांच्याकडे ४ आॅगस्ट २०१५ रोजी उसने पैसे घेण्यासाठी आला होता. गणेश शिंदे हा मागील दोन महिन्यांपासून माळशिरस येथे शांताराम यादव यांच्या शेतात मजूरी काम करुन कुटुंबासह राहात होता. गुटे यांना गणेश शिंदे याने ५ हजार रुपये उसने दिले़ त्यानंतर ५ आॅगस्ट २०१५ रोजी गणेश शिंदे यांच्यासह चंद्रसेन गुटे हे यवत येथे जेवायला जातो म्हणून आले. दोघेही दारु प्यायले.े त्यावेळी त्यांच्या गावावरुन उमेश महादेव शिंदे, धनंजय भागवत पवार, अनंता भजनदास सुरवसे, गोविंद पांडुरंग शिंदे हे टेम्पो चालक गोविंद पोपट शिंदे यांच्यासह आले होते.
गणेश शिंदे यांच्यासह गावावरुन आलेल्या चार आरोपींनी दि.५ रोजी रात्री यवत गावच्या हद्दीत भुलेश्वर घाटात गुटे यांचा दगड़ाने ठेचून खून केला व मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह घाटात फेकून दिला. त्यानंतर घरी आल्यावर त्याच्या पत्नीला चंद्रसेन हे परस्पर गावाला गेल्याचे सांगितले़ त्यानंतर त्यांची पत्नी गावाला गेल्यावर ते घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी गणेश शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यावर आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून शिंदे याने यवत पोलिसांना चंद्रसेन गुटे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली़ यासर्वांबरोबर असलेले टेम्पोचालक गोविंद शिंदे यांनी गुटे यांचा खुन केल्याची माहिती उस्मानाबाद येथील ढोकी पोलीस चौकीत दिली़ त्यांनी ही माहिती यवत पोलिसांना दिली़ यवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर घाटात गुटे याचा मृतदेह काल मिळून आला़ त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली असून गणेश शिंदे फरार आहे़ तपास यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)

पश्चातापाच्या भावनेतून तक्रार
टेम्पोचालक गोविंद शिंदे हे इतरांबरोबर आले होते़ ते सर्व जण घाटातून जात असताना खुनाची ही घटना घडली़ हे सर्व जण एकमेकांचे नातेवाईक आहेत़ या घटनेनंतर ते गावाला गेले़ पण गोविंद शिंदे यांना मनातून वाईट वाटत होते़ आपल्यासमोर पाप घडले आहे, अशी भावना त्यांच्या मनात येत होती़ त्यातून त्यांना रात्ररात्र झोप येत नव्हती़ शेवटी त्यांनी ढोकी पोलीस चौकीत जाऊन ही सर्व हकीकत सांगितली़ त्यातून खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे़

Web Title: Saadoo's blood for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.