मोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन येळवंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:50+5:302021-08-28T04:13:50+5:30
देविदास मेदनकर यांनी ठरल्याप्रमाणे सर्वांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत ...
देविदास मेदनकर यांनी ठरल्याप्रमाणे सर्वांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच शीला रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने सचिन येळवंडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक भास्कर वीर यांनी दिली.
या वेळी माजी उपसरपंच मंगल गवारे, किरण गवारे, देविदास मेदनकर, ग्रामसदस्य विश्वनाथ गवारे, अर्चना फलके, शीतल गवारे, माजी सरपंच एकनाथ करपे, अरुण फलके, गोरख गवारे, पोलीस पाटील नारायण बिडकर, गणेश करपे, संतोष रोकडे, प्रसाद करपे, नितीन करपे उपस्थित होते.
२७ कुरुळी
270821\20210827_083726.jpg
मोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन येळवंडे यांची बिनविरोध निवड