सदानंद माेरे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:02 PM2018-10-15T21:02:58+5:302018-10-15T21:04:18+5:30
सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली.
पुणे : सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली. पुण्यात अायाेजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात अाली. यावेळी जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ उपस्थित हाेते.
धुमाळ म्हणाले, महापुरुषांची बदनामी केलेल्या पुस्तकांच्या चाैकशी समितीवर सदानंद माेरे अाणि पांडुरंग बलकवडे यांना नेमण्यात येऊ नये. माेरे हे सरकारची तळी उचलण्याचे काम करतात. त्याएेवजी खरा इतिहास लिहीणाऱ्या लेखकांची या समितीवर नेमणूक करण्यात यावी. तसेच सरकारने येत्या 48 तासात वादग्रस्त पुस्तके मागे घ्यावीत. अन्यथा संभाजी ब्रिगेड अांदाेलन करेल.
दरम्यान पत्रकार परिषदेत सिंहगड एज्युकेशन साेसायटीकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची 1 हजार 779 विद्यार्थ्यांची अाठ काेटी रुपयांपेक्षा अधिक असलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता अपहार केला असल्याचा अाराेप करण्यात अाला. तसेच याप्रकरणी सिंहगड एज्युकेशन साेसायटीच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज चतुःश्रुंगी पाेलीस ठाण्यात देण्यात अाला असून गुन्हा दाखल करण्यासाठी उद्या 16 अाॅक्टाेबर राेजी कार्यकर्ते व विद्यार्थी पाेलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार अाहेत.