जेजुरीत सदानंदाचा यळकोट...! शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:31 AM2018-02-02T02:31:59+5:302018-02-02T02:32:13+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता.

 Sadananda's yellow jacket in Jezuri ...! Shikhri Karts Debhatei Yatra Yatra | जेजुरीत सदानंदाचा यळकोट...! शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता

जेजुरीत सदानंदाचा यळकोट...! शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता

googlenewsNext

जेजुरी - तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार खोबºयाची मुक्त उधळण करीत देवाच्या जयघोषात आज देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा यळकोट’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला. भंडा-यात न्हाऊन निघाला होता. शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता झाली.
माघ पौर्णिमेला जेजुरीत शिखरी काठ्यांची यात्रा भरते. संगमनेरकर होलम, सुपेकर खैरे आणि स्थानिक होळकर या मानाच्या तीन शिखरी काठ्या आणि त्यांच्या सोबत असणा-या इतर ५०हून अधिक प्रासादिक शिखरी काठ्या कुलदैवताची वर्षातून एकदा देवभेट घेत असतात.
सकाळी १० वाजता सुपेकर खैरे यांच्या शिखर काठीने गडाकडे कूच केली. छत्री मंदिर, तसेच होळकरांचा मान स्वीकारून मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून वाजतगाजत मिरवणुकीने गडाकडे निघाली. सोबत स्थानिक होळकरांची शिखर काठी होतीच. मानाच्या या दोन्ही शिखरी काठ्यांसमवेत इतरही प्रासादिक काठ्यांसह दुपारी १२ वा. गडावर पोहोचल्या. या वेळी देवाचा जयघोष आणि भंडार खोबºयाच्या उधळणीत काठ्यांची देवभेट झाली. सुपेकर खैरेंच्या काठीचे मानकरी शहाजी खैरे, सुरेश खैरे, शरद खैरे, होळकर काठीचे मानकरी बबनराव बयास, सतीश गोडसे, बाळू नातू आदींचा देवसंस्थानकडून सत्कार करण्यात आला.

मानाची काठी

दुपारी संगमनेरकर होलम राजाची मानाच्या शिखर काठीने मुक्काम स्थळावरून गडाकडे कूच केली. ऐतिहासिक छत्री मंदिर, होळकरांचा मान घेऊन मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून प्रासादिक शिखरी काठ्यांसह मानाची ही काठी वाजतगाजत ४ वाजता गडावर पोहोचली.
या वेळी संगमनेरहून आलेल्या सुमारे २० हजार भाविकांनी देवाचा जयघोष करीत मोठ्या प्रमाणावर भंडार खोबºयाची उधळण केली. याच जयघोषात काठीने गडकोटातील मुख्य मंदिराच्या शिखराला स्पर्श करून देवभेट घेतली.
या नंतर मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा, तुषार सहाणे, संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे, अ‍ॅड. अशोक संकपाळ, सोलिसिटर प्रसाद शिंदे तसेच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, रमेश राऊत यांनी मल्हारी मार्तंड होलम राजा सार्वजनिक काटकर मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काटे, उपाध्यक्ष भिकाजी गुंजाळ, विलास गुंजाळ, दिलीप गुंजाळ, निवृत्ती लांडगे, सीताराम अभंग, गोविंद भरीतकर आदींना फेटा व देवाचा फोटो, श्रीफळ देऊन सत्कार केला.
यानंतर शिखरी काठ्यांनी माघारीचे प्रस्थान ठेवले. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवसांची यात्रा पोलिसांच्या नियोजनामुळे शांततेत पार पडली.

Web Title:  Sadananda's yellow jacket in Jezuri ...! Shikhri Karts Debhatei Yatra Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे