सद्गुरू शंकर महाराज मठातर्फे दिव्यांगांना धान्य किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:46+5:302021-03-30T04:06:46+5:30
डिक्काईचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरू रघुनाथ येमूल यांनी दिव्यांगांना धान्य किट वाटप करण्याचा संकल्प केला. जानेवारीपासून हे धान्य किट वाटप ...
डिक्काईचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरू रघुनाथ येमूल यांनी दिव्यांगांना धान्य किट वाटप करण्याचा संकल्प केला. जानेवारीपासून हे धान्य किट वाटप सुरू झाले. याच उपक्रमात श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्ट सहभागी होऊन १०८ दिव्यांगांना गहू, तांदूळ, साखर, डाळ असलेले प्रत्येकी पंचवीस किलोचे किट सज्ज ठेवले.
धनकवडी येथील श्री शंकर महाराज मठाच्या सभागृहात सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, ध्यानगुरू रघुनाथ येमूल, अवनी संस्थेच्या प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक गुंदेचा, ट्रस्टचे सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्थ प्रताप भोसले, नागराज नायडू, गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे गणेश शेरला, शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका संगीता मरगजे यांच्या उपस्थितीत धान्य किट वाटप करण्यात आले.
स्वागत दिलीप जगताप यांनी, तर सूत्रसंचालन अपूर्वा ठाकरे यांनी केले. दिव्यांग व्यावसाय गटाचे अनिल कदम, सचिन पवार यांनी आभार मानले. संयोजन कर्तव्यनिष्ठ महिला मंच, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, अनाहत स्वराज आणि राष्ट्रशक्ती संघटनेने केले होते.