कलावंताला नशा चढली की साधना थांबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:32+5:302021-07-28T04:10:32+5:30
पुणे : नाव, प्रसिद्धी आणि रसिकांची वाहवा मिळू लागली की कलावंताला त्याचीच नशा चढते आणि त्या कोलाहलात त्याची साधना ...
पुणे : नाव, प्रसिद्धी आणि रसिकांची वाहवा मिळू लागली की कलावंताला त्याचीच नशा चढते आणि त्या कोलाहलात त्याची साधना थांबते. कलेप्रती असलेली निष्ठा जपण्याचा सूर मोजक्या कलाकारांनाच गवसतो. संगीतातून कैवल्यात्मक आनंद मिळतो, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ गायिका जयश्री कुलकर्णी यांच्या ‘सुरेल आठवणी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. लेखिका विनिता पिंपळखरे, गायक विजय कदम, आकाशवाणी पुणे केंद्राच्या माजी संगीत विभाग प्रमुख शुभदा अभ्यंकर, संजय गोखले यावेळी उपस्थित होते.
जयश्री कुलकर्णी म्हणाल्या, ‘लहानपणापासून आई-वडिलांनी दिलेले उत्तेजन, दिग्गज गुरू, विवाहानंतर माझ्या गाण्याची पाठराखण करणारे पती, संगीतप्रेमी संस्था आणि रसिक यांच्यामुळे ही वाटचाल होऊ शकली. गाण्याने माझे जगणे सर्वार्थाने समृध्द केले.’
संजय गोखले यांनी सूत्रसंचालन केले.