साधू वासवानी मिशनचे दादा वासवानी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:35 AM2018-07-12T11:35:33+5:302018-07-12T12:53:04+5:30
साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे अाज पुण्यात निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे.
पुणे : शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे गुरुवारी (12 जुलै) सकाळी 9.01 वाजण्याच्या सुमारास अल्पशा अाजाराने निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. येत्या 2 अाॅगस्ट राेजी त्यांचा शंभरावा वाढदिवस हाेता. तीन दिवसांपूर्वी दादा वासवानी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्यानंतर त्यांना घरीही अाणले हाेते. मात्र अाज सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. सदैव प्रसन्न असणाऱ्या दादा वासवानी यांनी संपूर्ण अायुष्य शाकाहारीचा प्रचार केला.
त्यांनी इंग्रजीमध्ये 68, कथासंग्रह 16, हिंदीत 19, सिंधीमध्ये 5, मराठीमध्ये 7, कन्नड 5, तेलगू 3, अरेबियन 2, चायनिज 1, डच 1, बहासा 4, स्पँनिस 12, गुजरातीमध्ये 1, ओरिया 5, रशियन 1, तमिळ९ , लँटवियन 1 पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अाध्यात्मिक गुरु म्हणून अाेळखले जायचे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त व्हिडीअाे काॅन्फरन्स तर्फे संवाद साधत दादा वासवानी यांना शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्यावेळी दादा वासवानी हे विनम्रतेचे प्रतीक असून ते भारतीय संत परंपरेतील या पिढीचे संत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते.
दादा जे पी वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहेलाजराय होते. पेहेलाजराय हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. दादा वासवानी यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद (पकिस्तान) येथे टी सी प्रायमरी स्कूल मध्ये झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे.