Pune: साधु वासवानी पुल पाडणार, शनिवारपासून पर्यायी व्यवस्था
By राजू हिंगे | Published: January 3, 2024 06:59 PM2024-01-03T18:59:54+5:302024-01-03T19:00:15+5:30
उड्डाणपूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे
पुणे: साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. आता हा पुल पाडण्यात येणार असुन प्रायोगिक तत्त्वावरती ६ जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
साधू वासवानी पुलाचे आयुर्मान ५० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. पालिकेने साधू वासवानी उड्डाणपूल धोकादायक बनल्यानंतर त्यावर डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेकडून गेले वर्षभर त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. महापालिकेने सद्यस्थितीतील पुलाची डागडुजी केली असली तरी स्लॅबचे सिमेंट पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पुल पाडण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने हा पुल जड वाहतुकीसाठी बंद केला आहे. प्रायोगिक तत्त्वावरती ६ जानेवारीपासून पुढील दहा ते पंधरा दिवस वाहतुकीची पर्याय व्यवस्था करण्यात येणार आहे. नगर रोड कोरेगाव पार्क, बंडगार्डन, कौन्सील हॉल , मोरवाडा या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. काही रस्त्यावर एकरी वाहतुक तर काही रस्त्यावर नो एन्ट्री करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुणे पोलीसचा वाहतुक विभाग जाहीर करणार आहे, असे पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत आंबेकर यांनी सांगितले.