साध्वी, महाराज, स्वामी संसदेत पाठवून तिथे काय कुंभमेळा भरवायचा आहे का ? सक्षणा सलगर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:02 PM2019-04-26T19:02:24+5:302019-04-26T19:12:01+5:30
भाजपवाल्यांनो संसदेवर काय जातीचे लेबल लावायचे आहेत का
चाकण : ही निवडणूक जातीची नाही, तर मातीची आहे. भाजपवाल्यांनो संसदेवर काय जातीचे लेबल लावायचे आहेत का? ज्या करकरेंनी मुंबईसाठी आपले प्राण दिले, त्यांना माझ्या शापाने मरण आले, असे म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वीला भाजपाने उमेदवारी दिली, त्यांना चालतं का हे ? फडणवीसांच्या काळात भीमा कोरेगाव घडलं, का घडलं ? त्याचे उत्तर द्या.. तुम्ही जाती जातीत विष पेरलं. मला प्रश्न पडलाय विकासासाठी उमेदवार पाठवायचे सोडून प्रज्ञा साध्वी, साक्षी महाराज, सोलापूरचे स्वामी हे संसदेत पाठवून कुंभमेळा भरवायचा आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केला.
चाकण येथील मार्केट यार्डात राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, अमोल कोल्हेंची जात काढू नका, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहा. तुम्हाला रजनीकांत, साऊथच्या कलाकार चालतात, आमचे कोल्हे नाही चालत का ? अहो आढळराव १५ वर्षे विकास केला असता, तर तुमच्या डोळ्यादेखत विमानतळ गेलं नसतं. महिलांचे धोरण पवार साहेबानी आणले. बेटी बचाव चे अभियान संपूर्ण महारार्ष्ट्रात सुप्रिया सुळेंनी राबवलं. राष्ट्रवादी लोकांशी नाळ जोडलेला पक्ष आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३० जागा काँग्रेस व राष्ट्रवादी जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे. जाती पातीचे राजकारण करणा?्यांनो मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला कुणी विरोध केला, हे उकरून काढू का ?
यावेळी माजी आमदार रामभाऊ कांडगे, दिलीप मोहिते, एस. पी. देशमुख, अनिल राक्षे, हिरामण सातकर, संभाजी खराबी, शांताराम भोसले, डी. डी. भोसले, अरुण चांभारे, कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, नूतन आवटे, हेमलता टाकळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.